STORYMIRROR

Neeraj Shelke

Inspirational

4  

Neeraj Shelke

Inspirational

जे देशासाठी लढले

जे देशासाठी लढले

1 min
606

भारताच्या पवित्र भूमीत 

अनेक क्रांतिकारक घडले , 

झाले अनेक हुतात्मे 

जे देशासाठी लढले !!


दिली अनेकांनी आहुती 

होता पारतंत्र्याचा तो काळ , 

स्वराज्य माझा हक्क आहे 

असे गर्जला एक बाळ !!


ब्रिटिशांनी लढवली शक्कल

विभाजित करा नी राज्य करा , 

हिंदु-मुस्लिम यांच्या ऐक्याला 

धर्मा -धर्मांने त्याज्य करा !!


गांधीजींनी दिला नारा 

ब्रिटिश लोक ' चले जाव ', 

अन् त्यांच्या या नाऱ्याला 

जनसमुदायाने दिला वाव !!


भगतसिंग, सुखदेव, राजगुरू 

हसत-हसत फासावर चढले , 

भारतमातेचे कित्येक सपूत 

स्वातंत्र्यासाठी प्राणाने लढले !!


मिळविण्यासाठी स्वातंत्र्य 

अनेकांचे रक्त होते वाहिले , 

या भारत भूमींने ते सारे 

उघड्या डोळ्याने होते पाहिले !!


लढले होते अनेक वीर जे

आज क्रांतिकारक म्हणवले , 

प्रणाम या भारतमातेला नीरजचा 

तिची गाथा लिहिण्या लायक बनवले !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational