जबाबदारीचे ओझे
जबाबदारीचे ओझे
मनसोक्त जगण हरवलं त्याचं
बांधलं पाठीशी ओझं जबाबदारीचं
गेलं विरून बालपण सहज
वयात कोवळ्या दंगामस्ती खोड्या करण्याचं...
फेरलं पाणी इच्छा-आकांक्षांवर
करण्या लढाई सोबत आयुष्याच्या
निघाला घेऊन ओझं जबाबदारीचं
राहिला उभा तो समोर संकटांच्या...
वाहताना ओझं जबाबदारीचं
फरफट त्या बिचार्याची खूप झाली
जगण्या अन जगवण्यासाठी स्वप्नांची
आपल्या त्याने माती केली...
ठेवून भान जबाबदारीचं
मान समाजात ताठ ठेवली
नाही केली कधी बेईमानी त्याने
वाट सत्याची होती नेहमीच धरलेली...
जिद्द लढाई जिंकण्याची
मनात त्याच्या घर करून होती
नाहीच हरला कधी तो आयुष्यात
इतकी प्रचंड त्याची आत्मशक्ती होती...
