Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pramod Bawiskar

Inspirational

3  

Pramod Bawiskar

Inspirational

जात....

जात....

1 min
7.4K

 मी एक जात पाहिलीय

आपल्याच बांधवांचे लचके तोडून

माळरानावर हाडे चघळणाऱ्या-

कुत्र्यांची.

मी एक जात पाहिलीय .

आपल्याच बांधवांच्या

मढ्यावरील लोणी खाणाऱ्या

गिधाडांची.

मी एक जात पाहिलीय .

झोपडपट्टील्या उकिरड्यावर

स्वतःच पोट भरणाऱ्या-
कावळ्यांची.....

मी एक जात पाहिलीय .

गर्भातच आपल्या मुलीचा

गळा घोटणाऱ्या अधम

मायबापांची.

मी एक जात पाहिलीय .

आपल्याच बांधवांच्या

पाठीत सुरा भोसकणाऱ्या

नराधमांची.

पण मी एक जात पाहिलीय

माणसाला माणूस म्हणून

जगवणाऱ्या खऱ्या

सज्जनांची....

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational