जाणता राजा
जाणता राजा
रयतेचे राज्य उभारले
योद्धा साहसी असा
जाणता राजा एकचि जाहला
थोर शिवाजी जसा
स्वराज्याचे भगवे वादळ
कल्याणकारी लढा
व्यर्थ न शिणवीले कधी कुणाशी
शत्रूस शिकवला धडा
परकीयांची मोडली गुलामी
जुलमास मारली ठेच
अभिनव राजा वीर शिवशंभो
अगणिक सोडले पेच
दश दिशा आजही गर्जती
पुजित पाऊल खुणा
एैसा पराक्रमी सहिष्णू राजा
होणे न पुन्हा पुन्हा !!
