जाणता राजा
जाणता राजा
जय शिवराय,जय शिवबा
महाराष्ट्राची शान
निधड्या छातीचे
रयतेचे जीव की प्रान
रक्तात शौर्य भिनलेलें
लढण्यासाठी मन तत्पर
रक्षिण्या स्वराज्य आपुले
नजर कायम दूश्मनावर
कधी ना मरणाची भीती
मावळे सगळे मर्द मराठी
परस्त्री मातेसमान मानली
जिवाची बाजी लावली शिवबासाठी
काय ते शिवबाचे रूप
आठवावा तो प्रताप
प्रेरणास्थान सकळजणांचे
आठवावा त्यांचा साक्षेप
