जागतिक वास्तुविशारद दिन
जागतिक वास्तुविशारद दिन
जागतिक वास्तुविशारद दिन...!
जा ण थोडी असावी राजा
ग तिमान जीवन जगताना
ति मिरातून समाधानआपल्यासाठी
क रकमलांनी ज्यांनीआणले त्यांचे
वा स्तवतेच्या पायावरती
स्तु त्य आलंय ज्यांनी निर्मिले
वि चारांच्याही पलीकडचे
शा श्वत ऐश्वर्य ज्यांच्यामुळे लाभले....
र मणीय आसरा निर्मूनी ज्यांनी
द व बिंदूंसम तेजस्वी सौख्य दावले
दि नकराच्या दर्शनासवे त्यांच्या चरणी
न तमस्तक होण्यालागी
क्षण मोलाचे हो आजदिनी आम्हा लाभले.....!
जागतिक वास्तुविशारद दिनाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
