जागतिक अन्न दिन
जागतिक अन्न दिन
सोळा ऑक्टोबर 2023...!
जागतिक अन्न दिवस..!
जागतिक अन्न दिवस आज
शुभेच्छा देण्या मिळाले काज
उतरला क्षणात पाहून माज
असा डोईवर पोशिंद्याचा साज..
पोट भरुनी मिळावे अन्न
मनी येता मती होते सुन्न
वाटते असे का होते असता परमेश्वर
काना कोपऱ्यात का पहात नाही ईश्वर...
भरल्या पोटाचे फार लाड
रित्या पोटास म्हणतात द्वाड
ही अशीच का असते खोड ?
गरीबाच्या नशिबीच का पदरमोड..?
जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने
ऐक प्रार्थना रे माझी देवा
सर्व प्राणीमात्रास मिळू दे रे मुबलक अन्न
होऊ देत रे प्रत्येकास प्रसन्न....
आता नको देवा दुष्काळ
सदैव नांदू दे सुकाळ
सौभाग्याने उजळू दे कपाळ
हे अर्जवाचे माझे टपाल..!
सर्वांना अन्न दिनानिमित्त अनेक शुभेच्छा..!
