STORYMIRROR

Shila Ambhure

Drama

3  

Shila Ambhure

Drama

जागर

जागर

1 min
14.2K




उत्सव नवरात्रीचा

झाली घटाची स्थापना

करू आराधना

जगदंबेची.


देवीचीच नावे

दुर्गा काली अंबिका

लक्ष्मी कालिका

सरस्वती.


तारावया जना

कराया दुष्टांचा संहार

घेतसे अवतार

जगन्माता.


देवीचेच रूप

असे समस्त स्त्रीजात

कष्टते दिनरात

कुटुंबासाठी.


जरी एकटी

असे शक्तीची खाण

कर्तव्याची जाण

सर्वकाळ.


मानुनि देवी

देऊया स्त्रीला मान

ठेऊया भान

स्त्रीशक्तिचे.


'साद' देते

नवरात्रीचा संदेश महान

करुया सन्मान

स्त्रीचा.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama