इतका द्वेष करू नकोस
इतका द्वेष करू नकोस
इतका द्वेष करू नकोस
नंतर पछतावशील बघ
कधीतरी माझ्याशिवाय
अनोळखी वाटेल हे जग||0||
मलाही त्रास होतो गं
सतत दुःख झेलायला
त्राण राहत नाही गं
वेदना ही पेलायला
आज तुझी वाट बघतोय
उद्या बात असेल अलग
कधीतरी माझ्याशिवाय
अनोळखी वाटेल हे जग||1||
फक्त तुझ्या सुखासाठी
तुझ्यापासून दूर आहे
प्रेमासाठी तुझ्या प्रिये
आज मी मजबूर आहे
जळत आहे हृदय माझं
जाणवेल का तुला धग
कधीतरी माझ्याशिवाय
अनोळखी वाटेल हे जग||2||
सर्व काही सहन करतो
केवळ एक तुझ्यासाठी
तुझीच स्तुती करत असतो
मी सतत तुझ्यापाठी
सर्वांना हे माहित आहे
कळत नाही का तुला मग
कधीतरी माझ्याशिवाय
अनोळखी वाटेल हे जग||3||
वाटतं आज कळेल तुला
हृदयात क्षण हे मावतील
असाच दिवस जातो निघून
असेच क्षण सरसावतील
बघत राहतो तासनतास
तुझेच चित्र एकटक
कधीतरी माझ्याशिवाय
अनोळखी वाटेल हे जग||4||
परीक्षा जास्त घेऊ नकोस
वेळ सांगून येत नाही
जीव जाईल यात माझा
काळ सूचना देत नाही
डोळ्यात अश्रू येऊन होईल
हृदयाची तुझ्या तगमग
कधीतरी माझ्याशिवाय
अनोळखी वाटेल हे जग||5||
निघून जाईन या जगातून
शोधशील मला सर्वत्र
नसतील खुणा माझ्या इथे
जग भासेल अभद्र
शांत होईल सर्वकाही
थांबेल सारी लगबग
कधीतरी माझ्याशिवाय
अनोळखी वाटेल हे जग||6||
वेळ निघून जाण्याआधी
समजून घे जमेल ते
अर्थ लाव माझ्या प्रीतीचा
उमजून घे जमेल ते
कधीपासून वाट तुझी
बघतोय प्रिये मी सलग
कधीतरी माझ्याशिवाय
अनोळखी वाटेल हे जग||7||
