इतिहास हा थोर
इतिहास हा थोर
आहे आपल्या देशाचा
इतिहास थोर
इथे स्वातंत्र्यासाठी युद्ध
झाले घनघोर
नाही केली पर्वा
जरी रक्त सांडले
स्वराज्यासाठी इथे
माझ्या राजाने युद्ध मांडले
ह्या दऱ्याखोऱ्या आहे साक्षी
साऱ्या इतिहासाच्या
तलवारीशी लागलं लग्न
गाथा शौर्याच्या
ऐतिहासिक वारसा
आहे मोठा
जपण्यासाठी तो
प्रयत्न हवा छोटा
अभिमान आहेच इतिहासाचा
गरज आहे संवर्धनाची
जपून राहील ऐतिहासिक वारसा
शान वाढेल देशाची
