STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract Others

4  

Sharad Kawathekar

Abstract Others

इथं ....तिथं ....

इथं ....तिथं ....

1 min
446

इथं खूप मोठी इमारत आहे

इमारतीत लगबगही आहे

इमारत देखणी आहे

पण अंगणात पारिजातक नाही 

काळजात वसंत नाही 

पापण्यात श्रावण नाही 

इवल्याश्या पिल्लासाठी

स्वप्नाच मणभर ओझं नाही 

लांबलचक गावकुस आहे

गावकुसालगत नदीचा काठ आहे

पण काठाला बालपणच नाही 

बालपण कधीच वाहून गेलंय पुलाच्या खालून 

माझा तुमच्या त्या बागेशी संबंध आहे

पण तुमच्यासाठी जगण्यासाठीचा उत्सव मात्र नाही 

असे काहीच नाही, कधीच नाही 

की, तुझी आठवण नाही असे काहीच नाही 

आहे इथं लगबग

आहे अंगण

पण ....

अंगणात पारिजातक मात्र नाही 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract