STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

इंद्रधनू

इंद्रधनू

1 min
270

आठवतो तो अजूनही लहानपणीचा काळ

 पाऊस पडून गेल्यानंतर 

पानां- फुलाला आलेला बहर  

फुललेली सुंदर ती गुलाबाच्या फुलांची माळ


 ऊन सावलीचा खेळ हा कोवळ्या

 ऊनासोबत आलेली अलगद रिमझिम सर

अवखळ वाऱ्याची अल्लड अशी लहर  


तुषार किरणांनी मग साकारलेला इंद्रधनू 

आणि सप्तरंगाची झालेली नभी उधळण 

पाहूनी अद्भुत किमया ही निसर्गाची हर्षित होई मन जणू


रंगाचा खेळ हा इंद्रधनू

 सुरेल गाणे गातो जणू 

सूर्यासोबत पैज लावूनी लपंडाव खेळतो  

लहान थोरांना सारखाच आनंद देत 

मुकुट आकाशाचा चमकदार कोहिनुर 

जणू शोभून हा दिसतो


वाटे इंद्रधनू प्रमाणे माणसांनी असावे अष्टपैलू  

हिरयाप्रमाणे चमकतील व्यक्तिमत्वाचे पैलू

त्याप्रमाणे आयुष्यात ही रंग भरावे  

ऊन पावसाच्या खेळात जीवनाचे सुरेल गाणे

गात माणसाने सदैव प्रफुल्लित, आनंदी असावे  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational