ईच्छा
ईच्छा
कुठे उमलयाचं, कधी उमलयाचं
हे कळ्यांचं कळ्यांनीच ठरवायचं
कुठे फुलायचं, कधी फुलायचं
हे फुलांचं फुलांनीच ठरवायचं
कुठे बहरायचं, कधी बहरायचं
हे झाडांचं झाडांनीच ठरवायचं
कुठे यायचं, कधी यायचं
हे ऋतूंचं ऋतूंनीच ठरवायचं
कुठे उडायचं, कधी उडायचं
हे पाखराचं पाखरांनीच ठरवायचं
