Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Tragedy Classics

3  

Rakesh More

Tragedy Classics

इच्छा मरून जातात

इच्छा मरून जातात

1 min
185


सतत अपयशाने 

सर्व इच्छा मरून जातात 

सर्व आशा आकांक्षा 

काळासोबत हरून जातात || 0 ||


स्वप्नांची तीव्रता 

कमी व्हायला लागते 

उमेदीची दिव्यता 

कमी व्हायला लागते 

जखमांच्या वेदनाही 

वेळेसोबत भरून जातात 

सर्व आशा आकांक्षा 

काळासोबत हरून जातात || 1 ||


मिळालंच पाहिजे ही 

जिद्द ओसरते 

उत्कट भावनाही 

अशा वेळी हरते 

हृदय सुन्न होतं 

भावना हृद्यावरून जातात 

सर्व आशा आकांक्षा 

काळासोबत हरून जातात || 2 ||


इच्छांचंही वय असतं 

त्याही काळानुसार मरतात 

संपला जन्म असाच ही 

भावना तीव्र करतात 

हरल्याची भावना 

मन पराजय करून जातात 

सर्व आशा आकांक्षा 

काळासोबत हरून जातात || 3 ||


फक्त जगायला 

नीटनेटका असतो 

प्रेयसी वीणा 

एकटा असतो 

रोमान्स च्या इच्छा ही 

हृदय घट्ट धरून जातात 

सर्व आशा आकांक्षा 

काळासोबत हरून जातात || 4 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy