ह्या घरी
ह्या घरी
घाई मलाच रोज वळायास ह्या घरी
देतो अपूर्ण सौख्य बनायास ह्या घरी
हॊते कधीच प्रेम मनातून काढले
झाली तुझीच भेट अनायास ह्या घरी
आगीत या जळून मला राख व्हायचे
नाही कुठेच आग जळायास ह्या घरी
नाही कुणी दिली गझलेलाच वाहवा
राही सुरेख दाद हसायास ह्या घरी
सौख्यास जाळते जग हे राक्षसी जरी
आलो बनून राख वसायास ह्या घरी
