STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

4  

Bharati Sawant

Inspirational

हूंकार गर्भाचा

हूंकार गर्भाचा

1 min
167

       

  आई वाढतोय तुझ्या उदरात

  गर्भ तुझ्या या दुर्भागी लेकीचा

  दबाव येतोय बघ गं तुझ्यावर

  गर्भातच माझा गळा घोटण्याचा


  भिऊ नकोस आता तू आई 

  हिमतीने हक्कासाठी दे तु लढा 

  वाईटपणा घेऊन प्रसव तु मला

  नको हकनाक भरु पापाचा घडा


   जन्माला घालुन आण मला

   प्रुथ्वीवरच्या सुंदर या जगात 

   तुझ्याकडुन दुसरे काही नको

 .  देईन सुख तुला या जन्मात


   होऊन मोठी बनेन साक्षर

   घराण्याची वाढवीन शान

   खानदानाचे नाव करीन रोशन

   गर्वाने होईल तुमची उंच मान


   सांभाळीन तुम्हां दोघांना

   मुलगा म्हणून जीवनभर 

   दुःखाची झळ नसेल कधी

   घेईन काळजी आयुष्यभर


   करणार नाही कधीच हट्ट 

   कपडे दागिने अलंकाराचा

   साधे जीवन उच्च विचार

   वारसा जपीन संस्कारांचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational