STORYMIRROR

Kishor Zote

Children

3  

Kishor Zote

Children

हट्ट (सहाक्षरी)

हट्ट (सहाक्षरी)

1 min
263

धरीतसे हट्ट

लाडाची ती लेक

घेवून ती दयावी

खेळणीच एक


किती समजावे

ऐकतच नाही

डोळ्याच्या पापण्या

ओल्या करू पाही


उद्या घेवू तरी

नाहीच म्हणते

हात पाय मग

उगाच झाडते


घेतले जवळ

लांब ती पळते

दुकानाची वाट

जवळ करते


हट्ट पुरवता

खूष खूप होते

गोड गोड पापा

गाली देवू जाते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children