हसतेस अशी जेव्हा तू
हसतेस अशी जेव्हा तू
हसतेस अशी जेव्हा तू
काळजाचा ठाव घेतेस
वेड्या माझ्या हृदयाला
प्रेमाचा घाव देतेस
कधी लखलखणाऱ्या चांदण्यांसारखी
गोड गोड हसतेस तर
कधी चंद्राच्या कोरीसारखी
गालातल्या गालात नाजूक हसतेस
खरं सांगू
हसतेस जेव्हा तू
माझ्या काळजाचा ठाव घेतेस
खोल माझ्या मनावरती
छबी तुझे उमटते
पाहण्या तुझे गोड हास्य
हृदय माझे तीळ तीळ तुटते
खरं सांगू
हसतेस जेव्हा तू
माझ्या काळजाचा ठाव घेतेस

