हसत रहा
हसत रहा
हसत रहा रे हसत रहा.
आनंदाने जगत रहा ......
चंद्र हसे तो दु:खी प्रियतमा.
हसत मुखी तो दिसता प्रियकर.
घडता भेटी हसते ओठी.
जाते विसरुनी क्षणी विरहा १.
दू:ख,संकटे ठायी ठायी.
रूतती काटे थकल्या पायी.
पण हसण्याने,खळळण्याने.
क्षणात दु:खे हरती दहा २.
आजार येती,येती दुखणी.
सदा लागते औषध पाणी.
हा हसण्याचा ,असे खात्रीचा.
बिन खरचाचा इलाज हा .३.
रडगण्याची विसरा चाल
उगा जीवाचे कशास हाल
हस जीवा रे, हास जिवा.
हास्य शब्द या ओठी लिहा ४
