हरीत रांगोळी
हरीत रांगोळी
हिरवळ मखमली
चराचरी विखुरली
सर पावसाची येता
वसुंधरा गंधाळली........१
पायवाटी काळी माती
हास्य मुख ल्यायलेली
भार फळाफुलांचा हा
फांदी पार वाकलेली......२
धरणीच्या कुशीलाही
अंकुराने जाग आली
हिरवळ इवलीसी
दाहीदिशी उभी झाली.....३
सवंगडी पशूपक्षी
शिवारात हुंदाळली
मोदभरी भावनांनी
धरा बागडू लागली.........४
सुख सर्वाग सुंदर
रूप हरित रांगोळी
औक्षणास सुर्यतेज
लाजे शेतकाया भोळी.......५
फुललेला रानमळा
उमलती पुष्प कली
हिरवळी गालीच्यात
रंग संगती खुलली........६
क्षण जपून ठेवावा
ओल्या चिंब ह्या ओंजळी
हिरवळ कायमची
मनी स्मृती दरवळी..........७
