हृदयस्थ
हृदयस्थ
भेट त्या वळणावर सखे
मला वाटले तू , तुला वाटले मी
खर सांगू,
थोडं थोडं दोघंही चुकलो होतो.
एकमेकांशिवाय काय जगणे
मला वाटले तू, तुला वाटले मी
खर सांगू,
दोघंही एकमेकांची वाट बघत बसलो
आयुष्या हा खेळ नसे
मला वाटले तू, तुला वाटले मी
खरं सांगू
एकमेकां समजून कोण घेतो?
नकोस ताणू रेशमी बंध हे
मला वाटले तू, तुला वाटले मी
खरं सांगू
मी एक पाऊल मागे सरतो
माझ्यात तू, तुझ्यात मी
एकमेकांत गुंफत, गुंतत
खर सांगू
प्रवास हा दोघांचा सोबत असतो.
