होळी रंगाची...
होळी रंगाची...
पेटुनिया होळी,
सण साजरा करू या...
दुविचारांची करुनिया राखरांगोळी...
विविध रंगाची उधळण करू या....
रंग घेऊनिया पिवळा...
बुद्धीचा विकास करू या...
आळसाला न देता थारा ..
लाल रंगाची उधळण करू या...
पांढरा रंग म्हणजे सरळपणाचे प्रतिक
फसवणूक, खोटेपणा सोडुन देवू या...
शितलता,पावित्र्याची आस धरुनी..
हिरव्या रंगाची उधळण करू या....
जांभळ्या रंगाची किमया न्यारी...
आध्यात्मिकतेची जाणीव धरू या
स्वतःबद्दल एकाग्रता,विश्वास निर्माण करुनी..
गर्द, सौम्य निळ्या रंगाची उधळण करू या...
लाल रंग पहा बरं..
दृढनिश्चय प्रदान करू या...
क्रोध,मत्सर, लोभ,संशय बाजुला सारुन
उत्साहदायी भगव्या रंगाची उधळण करू या...
