STORYMIRROR

kishor zote

Children

2  

kishor zote

Children

हम्माने ब्रश केला नाही .

हम्माने ब्रश केला नाही .

1 min
13.7K


हम्मा आली दारात

गळ्यातली घंटी वाजली

हर्षाली स्वयंपाकघरात

चपाती आणायला गेली....

'' आई ,आई , चप्पा दे ! 

हम्मा आहे बाहेर आली "

चपाती हातात घेवून आनंदे

हर्षाली दाराकडे पळाली.....

" बाबा , मला उच्चून घ्या "

येवून आजोबाला म्हणाली

आजोबांनी लाडे उचलून

मग दाराची कडी उघडली....

हर्षालीने केला हात पुढे

हम्माने जीभ बाहेर काढली

हर्षालीने दिलेली चपाती

हम्मा मग खाऊ लागली....

हम्मा कडे बघत बघत

हर्षाली विचारात पडली

" हम्माने ब्रश केला नाही ! "

आजोबाला सांगू लागली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children