हिंदोळा...!
हिंदोळा...!
एक नार देखणी
जणू हिरकणी
तोंडा सुटे पाणी
आली आणीबाणी
तारुण्याची हिरकणी
सौन्दर्याची गोड राणी
भरते प्रेमासाठी पाणी
अरे ती नार बावन खणी..
अंग शेलाटे
वाऱ्यावरी केस उलटे
पदर छातीवर सुलटे
अंगावरी उठले काटे
विचारास फुटले फाटे
नको नको ते घाटे
उर उभारीचे धीटे
खूप छान छान वाटे
पडले पाठी जरी रट्टे
नाद परी ना सुटे
खाऊ लागले गोते
उलटे पालटे होउनी सुलटे....!!