STORYMIRROR

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

ही वाट दूर जाते

ही वाट दूर जाते

1 min
256

खडतर वळणावर

काटेरी सलणारी लालीमा... 

प्रत्येक क्षणी नवीन आव्हान

मिळे त्यातून स्फूर्ती अन् गरिमा... 


वाट नसते ती सूतासारखी

प्रयत्न मात्र असावा प्रामाणिक... 

अंधाऱ्या मनातली काजळी सारूनच

मिळतील कठोर कष्टाचे तेजस्वी माणिक... 


येऊ देत पाषाणं प्रवासात कितीही

जिद्द चिकाटी अन् संयमाची असे ती परीक्षा... 

पाषाण भेदून अंतरीतील लहरींच्या ओघाने मिळे

भावी स्वप्नांतील आखाड्यांना आत्मविश्वासाची दिक्षा... 


आळोख्या वेळोख्या नागमोडी वाटेवर

जगायचे आयुष्यातील प्रत्येक अनमोल क्षण... 

वाटा या अशाच नकळत नेतात आपल्याला दूरवर

आपणही चालतांना परमात्याशी जवळीकता साधतो प्रतिक्षण... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational