STORYMIRROR

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

आमुची मायबोली

आमुची मायबोली

1 min
183

मराठी असे आमुची मायबोली

जरी आज ही 'राजभाषा' नसे

नसो आज ऐश्वर्य या माउलीला

यशाची पुढें दिव्य आशा

असे जरी पंचखंडांतही मान्यता


घे स्वसत्ताबळें श्रीमती

इंग्रजी मराठी भिकारीण

झाली तरीही कुशीचा तिच्या,

तीस केवीं त्यजी

जरी मान्यता आज हिंदीस देई

उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी मनाचे

मराठे मराठीस ध्याती

हिची जाणुनी योग्यता थोरवी

मराठी असे आमुची मायबोली


जरी भिन्नधर्मानुयायी

असूं पुरी बाणली बंधुता अंतरंगी,

हिच्या एक ताटात आम्ही बसूं

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं

वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी

जगन्मान्यता हीस अर्पूं

प्रतापे हिला बैसवूं

वैभवाच्या शिरीं

मराठी असे आमुची मायबोली


अहो पारतंत्र्यात ही खंगली

हिची थोर संपत्ति गेली

उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें

नियोजूं तयांना हिच्या मंडणी नको रीण,

देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational