STORYMIRROR

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

दुरावा

दुरावा

1 min
234

गुलाबी गुलाला ,कशी लाज आली 

कसा रंग त्याचाच त्याला कळेना ....

असा रंग लावून गेलास देहा

मला स्नान करण्या सख्या जाववेना...


तुझ्या त्या मिठीने अशी भांग प्याले

नशा आज त्याची मला साहवेना...

म्हणू केवडा तुज, कि दारू नशीली

मला बेवडीला खरोखर कळेना. ..


किती स्पर्श होती मना आपल्यांचे

तरी एकही का, खरा जाणवेना...

तुझ्या मनमहाली जगू दे मला रे

क्षणाचा दुरावा मला साहवेना....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance