STORYMIRROR

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

सलाम स्त्रीशक्ती

सलाम स्त्रीशक्ती

1 min
213

सलाम नारी सलाम 

तुझ्या कर्तुत्वाला सलाम 


तुझ्यातल्या विरक्तीला सलाम 

तुझ्यातल्या आसक्तीला सलाम 

मीरारूपी केलेल्या तुझ्या भक्तीला सलाम 


सलाम नारी सलाम 

तुझ्या कर्तुत्वाला सलाम 


तुझ्यातल्या सावित्रीला सलाम 

तुझ्यातल्या धरीत्रीला सलाम 

परमेश्वररूपी तुझ्यातल्या जन्मदात्रीला सलाम


सलाम नारी सलाम 

तुझ्या कर्तुत्वाला सलाम 


तुझ्या प्रत्येक कार्याला सलाम 

तुझ्यातल्या ऐश्वर्याला सलाम 

सात पावलासोबत सात वचन निभावणा-या भार्याला सलाम 


सलाम नारी सलाम

 तुझ्या कर्तुत्वाला सलाम 


चार भिंतितल्या सितेला सलाम 

वंदनीय गितेला सलाम 

उंच भरारी घेणा-या अस्मितेला सलाम 


सलाम नारी सलाम

 तुझ्या कर्तुत्वाला सलाम


तुझ्या बंधाला सलाम 

तुझ्या अनुबंधाला सलाम 

फुल बनून देणा-या तुझ्यातल्या 

सुगंधाला सलाम 


सलाम नारी सलाम

 तुझ्या कर्तुत्वाला सलाम 


तुझ्या गगनभेदीला सलाम 

तुझ्या मंत्रवेदीला सलाम 

झूंजार अशा तुझ्यातल्या किरण बेदीला सलाम 


सलाम नारी सलाम

 तुझ्या कर्तुत्वाला सलाम 


तुझ्या गोङ वाणीला सलाम 

तुझ्यातल्या लता गाणीला सलाम 

रणांगणावर लढणा-या तुझ्यातल्या झाशी राणीला सलाम 


सलाम नारी सलाम

 तुझ्या कर्तुत्वाला सलाम


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational