STORYMIRROR

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

2  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

माझ्या आकाशातील रंग

माझ्या आकाशातील रंग

1 min
83

माझं जगणं माझं आकाश

निरभ्र अन् स्वच्छंद

मीच भरले आहेत 

माझ्या आकाशातील रंग 


मीच राधा माझा कृष्ण

माझं पिल्लू माझं घरटं

माझी अस्मिता माझं काव्य

माझा ऋतूही राजा वसंत 


माझ्या या रम्य आकाशी

वेदनांना नाही ठावं

अश्रू अन् उसास्यानाही

येथे आहे मज्जावं 


संकटांनीही मोठमोठ्या

खुशाल येथे येऊन पहावं

हिम्मतीचीही दाद पाहून

आल्या पावली परतून जावं 


माझ्या आकाशाचे रंगी

कुणीही यावं रंगून जावं

नवरंगी या आकाशाचे

गुपित येऊन समजून जावं 


सप्तरंगी नि इंद्रधनुषी

हे आहे फक्त माझे आकाश

काळे ढग येथे येण्याचं

सदाच मनोमनी घाबरतात 


उठत असती सदाच येथे

सप्तसुरांचे ही तरंग

मीच भरले आहेत या

माझ्या आकाशातील रंग 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance