Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

आलो गुलाल घेऊनी

आलो गुलाल घेऊनी

1 min
202


आलो गुलाल घेवून 

तुला रंग लावण्यासाठी

तू होती रंग खेळत

मैत्रिणीच्या सोबती ,


हसत होती छान तू 

रंग लावत होती 

गालावर होता लाल हिरवा रंग तुझ्या 

इंद्र दरबरातली अप्सरा दिसत होती ,


तुला पाहून मन झालं व्याकुळ माझं

तुला रंग लावण्यासाठी 

तू पण रंग पकडून ये ना 

मला रंगविण्यासाठी ,


लाल हिरवा निळा रंग

आहे माझ्या सोबती 

तुझ्या गलातला हास्य

लाजवत होता मला माझ्या मनाशी ,


मी गुंतलो होतो मनाने

तुझ्या त्या रंगाशी 

तुझ्या ओठावरची लाली

उमटवशिल का ?

माझ्या ओठावरती ,


प्रेमाने मार मिठी 

माझ्या शरीरावरती

उधळू दे गुलाल 

आपल्या अवती भवती ,


पिचकारी आहे तुझ्याजवळ रंगाने भरुनी 

लपून मार तू पिचकारी माझ्यावरती

आज आहे रंगाची रंगपंचमी

रंग उधळू आपण दोघे आपल्या अवती भवती ,


रंगून जाऊ आपण दोघे

प्रेमाच्या या सात रंगामध्ये

हरवून जाऊ आपण दोघे

इंद्र धनुच्या सात रंगामध्ये...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance