समय लागेल...
समय लागेल...
समय लागेल समजाया जरासे...
अनादी फूल उमलाया जरासे...
मधुरंगी मुखवटे भासे गुलाबी,
सुगंधी रंग बहराया जरासे...
रस्ताही भाळला काट्याकुट्यांना,
फिरव पाठ मग लहराया जरासे...
लव्हाळा बेरका वाटे दिलाला,
बहावा आण सजवाया जरासे...
बहाणे लाख सांगत जाशिल बरा,
असावे कान उमजाया जरासे मधुरा...

