STORYMIRROR

vaishali vartak

Romance

3  

vaishali vartak

Romance

धुंद झाली आज प्रीत

धुंद झाली आज प्रीत

1 min
301

तुला भेटण्याची सदा

ओढ लागली जीवाला

कधी येशील जवळी

सांग माझिया मनाला


वाट तुझी बघण्याची

वेड्या मनाची ही रीत

बघ सांजवेळ झाली

धुंद झाली आज प्रीत


शहारते मम काया

स्पर्श होता अलवार

मोहमयी तव हात

फिरु देना हळुवार


पहा कशी बहरली

धुंद गंध रातराणी

हात घेउनी हातात

गाऊ दोघे प्रेमगाणी


तव प्रेमाची सखया

वाट पाहती लोचने

धुंद मंद या समयी

ऐक माझे तू सांगणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance