STORYMIRROR

Surekha Chikhalkar

Romance Others

3  

Surekha Chikhalkar

Romance Others

मन

मन

1 min
342

सांग ना मन हे का हुरहुरते

उगीच का बावरते

ना आस कुणाची तरीही

अनाहुत चाहूल जाणवते.....

मनाचे रंग अन् तरंग

नसे जवळी कोणी

मन का चंचलते

सांग ना मन हे का हुरहूरते....

तन हे घायाळ

काजळडोह एकांत काळ

मन का काहूरते

सांग ना मन हे का हुरहूरते.....

कासावीस जीव

मुकेपणाची कीव

मन का अधीर होते

सांग ना मन हे का हुरहूरते....

दव बिंदू पांघरूनी

आस स्पर्शाची धरावी

मन का परके होते

सांग ना मन हे का हुरहूरते....

कवडसे भावनांचे

छळणाऱ्या काळोख रात्रीचे

मन का उगीच जागवते

सांग ना मन हे का हुरहूरते

उगीच का बावरते.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance