सखा माझा
सखा माझा
स्वप्ने घेऊन कुशीत माझी निजलासे सखा माझा
सुख-सौख्याचा आनंदघन भासलासे सखा माझा.
माझ्या ईच्छांचा कल्पतरू जाहलासे सखा माझा.
प्रीतीच्या गोड रितीत गुंतलासे सखा माझा.
धुंद मोगऱ्यात मोहक बहरलासे सखा माझा
रातराणीच्या सुगंधात गर्द दरवळलासे सखा माझा.
शब्द सूर जागवित दुमदुमलासे सखा माझा
विसावलेल्या क्षणांचा साक्षीदार सखा माझा

