आयुष्यातून माझ्या दुर गेलास
आयुष्यातून माझ्या दुर गेलास
माझ्या आयुष्यातून दुर गेलास
माझ्या कवितेपासून दुरावू नको ..
एकच तो मज दिलासा आहे
त्यालाही तू हिरावू नको ..
मी लिहित राहीन जन्मभर असाच
तुझा चेहरा डोळ्यांत साठवून ..
एक एक अश्रुंनी भरेल पान
लिहिताना तुलाच आठवून ..
नकळत वाचनात येतील कविता
फक्त कोणी लिहिल्या विचारू नको ..
आलीच कधी आठवण माझी तर
तिथे एक क्षणही उभारू नको ..
फक्त माझ्या कवितेला आपलं कर
माझ्या भावनेला जुगारू नको .

