एक मोरपीस प्रेमाचे
एक मोरपीस प्रेमाचे
मनातल्या आभाळात उडाले
एक मोरपीस अन् अलगद ढगांमध्ये लपले ,
मनही मग गेले त्याच्या पाठी
अन् धरुनी त्यास हाती ते हृदयाशी जपले !
मोरपीसाला त्या होता तुझ्या माझ्या आठवणींचा सुगंध ,
जणू त्या आठवणींचे आहेत
आपल्या आयुष्याशी जन्मांतरीचे अनुबंध !
अवखळ अल्लड लपलेले ते मोरपीस
पुन्हा एकवार फिरले माझ्या काळजावरून ,
अंगी उमटले शहारे अन् मला जाणवला
तुझ्या अस्तित्वाचा सुगंध आलेला दुरून !

