STORYMIRROR

Deepali Mathane

Romance

3  

Deepali Mathane

Romance

तुझीच साथ

तुझीच साथ

1 min
402

तुझी साथ हिच आस आजन्म बाळगेन मी

तुझी माझी प्रीत आजन्म सांभाळेन मी

   अनेक दुःखाचे डोंगर हसत पार करेन मी 

    श्वासातला श्वासही तुझ्या सोबतीला उरवेन मी

स्वप्नातल्या कळ्यांना अलगद खुलवेन मी

गंधाळल्या क्षणांना हृदयांतरी झुलवेन मी

    तीक्ष्ण शब्दांचे घाव तुझ्या साथीने बुजवेन मी

    माझ्या नक्षत्रांच्या वेली तुजसाठी रुजवेन मी

क्रिष्ण सखा तु बासुरीत तुझ्या नादावेन मी

जीवनाच्या सप्त सूरात अलगद विसावेन मी

   तुझी साथ जगण्याच्या उमेदीला पुरवेन मी

  आला काळ जरी तरी तुझ्यातच मला उरवेन मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance