भेट तुझी -माझी
भेट तुझी -माझी
सखा भेटलासी मज
अवचित हा रानात
देई प्रेम पत्राची ही भेट
निर्जनशा काननात
जीव धडधडे माझा
लपू कुठे फुला-पानात
लाज दाटूनिया आली
अलवार रूजली गालात
तुझी नजरही खिळे
भाव दिसे नयनात
भेटीची ही ओढ सख्या
माझ्या सजली मनात
हरपले भान सख्या
गुंतली नजर-नजरेत
तुझ्या प्रेमाचे धुके दाट
पसरले या वाटेत
प्रीत बहरली कशी
हळूवार या छायेत
जीव वेडावला माझा
तुझ्या निरागस मायेत
देशील का?मज साथ
रंग भरूनी जीवनात
तुजसवे चालेन मी सप्तपदी
बांधून घे प्रेम वचनात

