गुलकंद प्रेमाचा
गुलकंद प्रेमाचा
साखरेचा गोडवा
गुलाबाचा सुवास
गुलकंद प्रेमाचा
तुझ्यासाठी खास....१!
प्रेम पाकळ्या घेऊ
प्रीतीचा मकरंद
एकजीव,एक श्वासछा
छान होई गुलकंद...२!
गुलकंदाचा गोडवा
प्रेमात क्षणोक्षणी
सदा ठेव आठवण
आनंद हा मनोमनी...३!
निरागस पाकळ्या
उमलती अलवार
सुंदर जीवनाचा रे
सख्या तू शिल्पकार...४!
सुगंधित गुलाबाची
करू हळू उधळण
गुलकंद एकजीव
प्रेमरूपी पखरण...५!

