STORYMIRROR

vaishali vartak

Romance

3  

vaishali vartak

Romance

तू तिथे मी

तू तिथे मी

1 min
192

गंध सुमनाना कधीच

 दूर, न करी खचित

तैसे तू तिथे मी

रहाणार सदोदित


आहे तसेच आपले 

दोन तने एक मन

विसर पडे, न कदा

जीवा एकही क्षण


रहावे तू मम संगती

असेच वाटते मनात

साथ हवी निरंतर

हीच आस अंतरात   


येते नभी चांदणी

वाट पहाते चंद्राची

तैसे तू तिथे मी

असणार सदाची  


 कशी जगेल मासोळी

 जला विना पळभर

 तुझ्या अस्तित्वाने

 दिसे दिशा खरोखर  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance