स्वप्नी चा राजा कविता
स्वप्नी चा राजा कविता
राजकुमार माझ्या विचारी असा....
ज्याच्या हृदयी मला मीच सापडावी
नयनी फक्त माझी आस असावी..
ज्याची प्रतिमा जरी दिसत नसेल स्पष्ट
तरी तो असेल सर्व गोष्टीत उत्कृष्ट..
माझ्या आतुरतेने जो झाला जरी बेजार
पण दुसऱ्या कोणाचा नसावा मनी विचार
कारण माझंच रूप व्हावे त्यासमोर साकार
त्यात खऱ्या प्रेमाची परीक्षा होते फार..
बनावा माझ्यासाठी तो भक्कम आधार
जसा कोमल वेलीला वटवृक्ष डेरेदार...
सागरापरी अथांग आमच्यात स्नेह असावा
योग्य वेळी असा वर मला भेटावा

