Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational Others

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational Others

आमची मायबोली

आमची मायबोली

1 min
232


*गरीब नाही गाय मराठी!*

*खमकी आहे माय मराठी!!*

*वाचलास का तुक्या, ज्ञानिया?*

*कळेल मग की, काय मराठी!*

*का न व्हायची गझल मुलायम?*

*तिच्यात आहे साय मराठी!*

*नकोस समजू लेचापेचा......*

*लटपटेल का पाय मराठी?*

*अंतरजालावरी मराठी!*

*नवीन हा अध्याय मराठी!!*

*समाज सारा साक्षर करण्या.....*

*एकच तरणोपाय मराठी!*

*असो परिक्षा सरकारीही....*

*तिथे हवा पर्याय मराठी!*

*मराठीतली वृत्ते वाचा.....*

*समजेल.... महाकाय मराठी!*

*मोडतोड बघुनी भाषेची......*

*पहा फोडते धाय मराठी!*

*उंच उंच शिखरांवरतीही......*

*पहा पोचले पाय मराठी!*

*असो कितीही खुर्ची मोठी.....*

*असतो तिजला पाय मराठी!*

*बहुभाषांच्या वटवृक्षाचे......*

*जमिनीमधले पाय मराठी!*

*गाथा घ्या वा, दासबोध घ्या......*

*दिसेल तुम्हा साय मराठी!*

*जातानाही ‘येते’ म्हणते......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational