STORYMIRROR

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

उद्या तुला भिजवायला

उद्या तुला भिजवायला

1 min
221

उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे

उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे


मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे

तुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे


उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस

उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस


आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची

उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस


“सणाला तरी हसत जा” तु अस म्हणशील”

बाहेरच जग पाहत जा” तु असही म्हणशील


“कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण

तु मात्र सुखाने जगत जा” तु असही म्हणशील


पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोय

यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोय


आठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगात आता

तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance