STORYMIRROR

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

होय अशीच आहे मी

होय अशीच आहे मी

1 min
206

होय अशीच आहे मी •• 

•• उसळणाऱ्या लाटांसारखी ••

•• स्वच्छंद फुलपाखरासारखी ••

•• खळखळत्या पाण्यासारखी ••


•• थोडीशी वेडी थोडीशी हळवी ••

•• म्हटले तर प्रेमळ ••

•• म्हटले तर स्वच्छ मनाची ••

•• स्वतःवर प्रेम करणारी ••

•• नेहमी मैत्री जपणारी ••


•• देवाने निर्माण केलेली अजब ••

•• रसायन आहे मी ••

•• अशीच आहे मी ••

•• अशीच आहे मी ••


•• मी आहेच अशी मैत्री करणारी 

•• मैत्रीसाठी वाट्टेल ते करणारी ••

•• प्रत्येक मित्र आणि मैत्रिणींचा विश्वास

जपणारी ••

•• आयुष्यभर घट्ट मैत्रीची

साथ निभावणारी ••


•• मी आहेच अशी ••

•• सतत बोलणारी ••

•• मित्रमैञिणींना नको ते प्रश्न विचारणारी ••

•• प्रश्न विचारून त्यांना सतावणारी ••

•• उत्तरे सांग म्हणून तगादा लावणारी ••


•• मी आहेच अशी मस्त जगणारी ••

•• आपल्यातच आपलेपण जपणारी ••

•• पण इतरांच्या आनंदासाठी

स्वतःलाही विसरणारी ••


•• मी आहेच अशी ••

•• मनासारखं जगणारी ••

•• यशाचे शिखर चढताना हात देणारी ••

•• अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारी ••

•• सुःखाच्या रस्त्यावरून जाताना आयुष्य सजवणारी ••


•• मी आहेच अशी ••

•• सर्वांचे ऐकणारी ••

•• मित्रमैञिणींवर जास्त विश्वास ठेवणारी ••

•• त्यांच्या कोणत्याही निर्णयावर

समाधानी असणारी ••


•• मी आहेच अशी ••

•• मनातून मैत्री करणारी

केल्यावर आयुष्यभर निभावणारी ••


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational