STORYMIRROR

Rajani Bhagwat

Romance

3  

Rajani Bhagwat

Romance

तुझं माझं जमायला हवं होतं

तुझं माझं जमायला हवं होतं

1 min
339

तुझं माझं जमायला हवं होतं

असं सर्वांना वाटायचं

तू होतास मदनाचा पुतळा

पण माझ्यात तरी काय कमी होतं

तरीही तू मात्र कधीच सोडलं

नाही अॅटीटयुड दाखवायचं

तिरप्या कटाक्षांना माझ्या

बघून ही दूर्लक्ष करायचं

अचानक समोर आलेच तर

मान वळवून निघून जायचं

सतत येता जाता माझी

अशी उपेक्षा करायचं

वागणं तुझं असं पाहून

मन माझं पेटून उठायचं

संधी मिळताच तुला

आडून टोमणे मारायचं

एके दिवशी ठरवलं

तुला धडा शिकवायचं

जिवलग मित्रासोबत तुझ्या

लाँग ड्राईव्हला जायचं

तुझ्यासारखचं आता

अॅटीट्युड द्यायला शिकायचं

रसभरीत वर्णन त्याचं

तुझ्यासमोर ऐकवायचं

ऐकूनच वाटायला हवं तुला

तू तिथे असायल हवं होतं

इतरांना काय वाटत ते जाऊ दे

पण तुझं माझं जमायला हवं होत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance