2021 मध्ये काय शिकले
2021 मध्ये काय शिकले
1 min
116
आता काहीसे उमजत आहे
आता कुठे उजाडत आहे
2021 मध्ये खूप काही शिकले
स्कूल फ्रॉम होम पहिल्यांदाच पाहिले
बेडरूममध्ये माझ्या डिजीटल शाळा भरली अन
पुन्हा एकदा शाळेत जाण्याची हौस माझी भागली
एक पिरियड ऑफ मिळाला की होती धमाल मस्ती
पण या डिजीटल शाळेत करी नेटर्वकच खूप मस्ती
पुन्हा एकदा पहिलीत गेले चौदाखडी गिरवू लागले
डिजीटल जमान्यात या स्वतःला अपडेट ठेवू लागले
ऑनलाईन व्यासपीठावर पहिल्यांदाच सादरीकरण
केले अन डिजिटल सर्टीफिकेटस पटकावून
शाळा कॉलेजचे दिवस अनुभवले
नाही म्हणायला थोडीशी आध्यत्मिक ही झाले
आणि श्रद्धा व सबुरी हे साईबाबांचे वचन ही अनुभवले
