STORYMIRROR

Rajani Bhagwat

Romance

3  

Rajani Bhagwat

Romance

ती (कॉफी) आणि तो (चहा)

ती (कॉफी) आणि तो (चहा)

1 min
352

त्याला चहा आवडायचा

पण तिला मात्र कॉफी

कुठल्या हॉटेलमध्ये जावं

याची नेहमीच पंचाईत व्हायची

त्यानं अमृततुल्य निवडलं

तर तिला कॅफे कॉफी डे हवं असायच

थोडा वेळ एकत्र घालवावा म्हंटल तर

हे चहा कॉफीचं भांडण जुंपायच

कसली ती कडू कॉफी

का उगीच प्यायची त्यापेक्षा

चहा च बरा त्याची बडबड चालायची

त्याच्या अश्या बोलण्यावर

ती खूप चिडायची , न बोलता त्याच्याशी

तिथून निघून जायची

एका कपातून चहा प्यायचा

त्याची होती फॅन्टसी

तर चिंब भिजल्यावर एक कॉफी

आणि त्याची मिठी हीच तिची फॅन्टसी...


फॅन्टसी मनातच राहीली

अन् त्यांचं ब्रेकअप झालं

चहा कॉफीच भांडण असं

कॉफी मग आणि चहाच्या कपात विरलं

कॉफी आवडत नसली तरी

ती त्याला आवडायची

त्याच्या आठवणीत ती ही

चहाच्या कपासोबत रात्र जागवायची...


त्याच्या मनात मात्र तिची जागा अजूनही आहे

तिच्या आठवणी काढत कॉफीमुळे तो जागा आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance