उत्तरायण
उत्तरायण


उत्तरायण लागले दिवस पालटले
निर्सगाने ही आपले रुप बदलले
गुलाबी थंडी खुणावू लागली
शेकोटी मग ठीकठिकाणी पेटली
मुलांनी आपली पतंग सजवली
काटाकाटीला चांगलीच रंगत चढली
सणावारांची रांग लागली
संक्रांत, पोंगल, बिहू, लोहड़ी
सणांची नावे सांगू तरी किती
ऊधियों, गुळपोळीची लज्जत न्यारी
हुरडा पार्टीही मजेत रंगली
गुळाची गोडी, तिळाचा स्नेह
हलव्याचे दागिने काळी साडी
लेवून सजली घरची लक्ष्मी
उत्तरायणाची प्रतिक्षा संपली
पतंग माझी आकाशी सजली