STORYMIRROR

Deepali Mathane

Romance

3  

Deepali Mathane

Romance

गंध तुझा

गंध तुझा

1 min
403

गंध तुझा नक्षत्रांच्या

चांदण्यात भरला

आठवणीच्या नभांगणी

चंद्र होऊनी वरला

  गंध तुझा रातराणीच्या

  सुगंधासवे मुरला

  वाऱ्याच्या झुळूकेसह

  माझ्या श्वासात पुरला

गंध तुझा पारिजातकाच्या

नाजूक फुलात शिरला

एक-एक फूलं वेचितांना

 फुला-फुलातं विरला

   गंध तुझा आसमंती 

   कणाकणात जिरला

   उधळूनी रंग सारे

    कुंचला हा फिरला

गंध तुझा श्रावणाच्या

सरीतूनी बरसला

तुजसवे सहवासाला

एकेक क्षणही तरसला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance