STORYMIRROR

Vaishali Belsare

Romance Others

4  

Vaishali Belsare

Romance Others

गंधभास

गंधभास

1 min
307

मना स्पर्शती हळवे

तुझ्या आठवांचे वारे

तुला स्मरताच येती

सख्या देहात शहारे............


जागे चांदण्यांची रात

नभ आसुसले सारे

धुंद काजळ प्रहरी

होई मन हे बावरे.........


शांत हळद दुपारी

जीव असा हुरहुरे

वाट नैनी दाटे अन् 

मनी गंध भास सारे........


श्वास श्वास गीत गाई

उरी धडधड भरे

तुझी चाहूल लागता

येती नभांगणी तारे..........


बेभानल्या गारव्यात

मन मनास सावरे

देहभर शहाऱ्यांनी

मीच माझ्यात ना उरे........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance